जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी चार आरोग्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. यावेळी सानप यांनी कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक तपासून त्यांची गैरहजेरी नोंदविली.
आरोग्य केंद्रात अँटिजन किट नसल्याचे दिसून आले. अँटिजन किट जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असूनदेखील आरोग्य कर्मचारी किट आणण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले. सरपंच सतीश चव्हाण, ग्रामसेवक पाडोळे यांच्याशी झूम ॲपवर गटविकास अधिकारी सानप यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच सतीश चव्हाण अनेक समस्या मांडल्या. आरोग्य केंद्रात अँटिजन किटचा अभाव असल्याने गेल्या १० दिवसांपासून स्वॅब घेणे बंद झाले आहे, असेही सरपंच चव्हाण यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. अवद्युत शेख यावेळी उपस्थित होते.
सानप यांनी गैरहजर असलेल्या डॉ. पल्लवी जोडपे यांच्याशी संपर्क करून त्यांनाही समज दिली. कोरोनाचा आणीबाणीचा काळ आहे. सतर्कतेने काम करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
===Photopath===
170521\img_20210517_131338_14.jpg