शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

कार्यशाळेला गैरहजर, ८ बीईओंवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 11:50 PM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्टÑीय पातळीवर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा तसेच इतर उपक्रम सुरु आहेत. या अभियानांतर्गत गावपातळीवर करावयाच्या उपाय योेजनेबाबत घेण्यात आलेल्या कार्यशाळेकडे पाठ फिरविणाऱ्या ८ गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्टÑीय पातळीवर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा तसेच इतर उपक्रम सुरु आहेत. या अभियानांतर्गत गावपातळीवर करावयाच्या उपाय योेजनेबाबत घेण्यात आलेल्या कार्यशाळेकडे पाठ फिरविणाऱ्या ८ गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.केंद्र शासनाच्या वतीने राष्टÑीय पातळीवर स्वच्छता दर्पण स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेत १३६४ गावांचा सहभाग होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात २३ आॅगस्ट रोजी राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा सुरु झाली. यावेळी सर्व विभागांना स्पर्धेच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होत्या. याच दिवशी जिलहाभरात शिक्षण विभागाची कार्यशाळा असल्याने व त्यासाठी जवळपास ९ ते १० हजार शिक्षक येणार असल्याने गटशिक्षणाधिका-यांनी त्यांना राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेबाबत माहिती देऊन ग्रामस्थांना त्यांचे मत अ‍ॅपद्वारे नोंदविण्यासाठी पाठपुरावा, जगजागृती करावी असे सुचविले होते. मात्र विद्यार्थी व पालकांपर्यंत हा संदेश शिक्षकांमार्फत पोहचविण्यात गटशिक्षणाधिकारी कमी पडले. स्वच्छतेच्या अ‍ॅपवर केवळ दोन हजार मते नोंदल्याची बाब समोर आली. परिणामी बीडचा राज्यातील ८ पर्यंत रॅँक घसरला. यातच संत गाडगे बाबा हागणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणी टप्पा - २ सुरु झाला आहे. या विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणीसाठी २८ आॅगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन केले होते.गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य, शिक्षण, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी यांच्यासह यंत्रणेतील गटसमन्वयक, प्रेरक कर्मचाºयांसाठी ही कार्यशाळा होती. या कार्यशाळेत तालुका पातळीवर शिक्षण विभागाचा महत्वाचा घटक असलेल्या गटशिक्षणाधिका-यांचीच उदासिनता दिसून आलीबीडीओंनाही घेतले फैलावरमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी भेट दिली तेव्हा कार्यशाळेत केवळ बीड, अंबाजोगाई आणि वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले.इतर ८ गटशिक्षणाधिका-यांनी मात्र दुपारच्या सत्रानंतर दांडी मारल्याने तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत ८ गैरहजर गटशिक्षणाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत विचारणा केली आहे.विविध उपक्रमांतील कामकाज, प्रगती तसेच इतर पूरक विषयांबाबत ढिलाई दिसल्याने गटविकास अधिका-यांनाही सीईओंनी फैलावर घेतले.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान