बीड : वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांना आमदार रणजीत कांबळे यांनी शिवीगाळ केली. याचे पडसाद सोमवारी पूर्ण राज्यभर उमटले. या प्रकरणाचा निषेध करण्यासह आमदारांवर कारवाई करावी, अन्यथा राज्यातील सर्व आरोग्य सेवा बंद करण्याचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी स्ंघटनेने दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठविले आहे. शिवीगाळ प्रकाराने मात्र राज्यातील आरोग्य विभागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाची महामारी सुरू आहे. यात सर्वात पुढे होऊन आरोग्य विभाग काम करत आहे. वर्षभरापासून अधिकारी, कर्मचारी सुट्टी न घेता २४ तास सेवा देत आहेत. त्यामुळे ते तणावात आहेत. त्यांना लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी आधार देण्यासह सहकार्य करण्याची गरज आहे. परंतू वर्धा येथे संतापजनक प्रकार घडला आहे. वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डवले यांना काेरोना चाचणी शिबीरावरून देवळी-पुलगाव विधासनभा मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे यांनी कॉल करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच अश्लिल शिवीगाळ करत पोलीस ठाण्यात येऊन जीवे मारण्याच्या धमकी दिली. हा प्रकार समजताच राज्यातील आरोग्य विभाग आक्रकम झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने तात्काळ मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आदींनी पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. वेळीच यावर दखल घेतली नाही तर राज्यात कामबंद आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
बीडमध्येडॉक्टरला मारहाण, पण तक्रारच नाहीचार दिवसांपूर्वी बीडमध्ये कर्तव्यावर जाणाऱ्या डॉ.विशाल वनवे यांना पोलिसांनी मारहाण केली होती. परंतू डॉ.वनवे यांनी तक्रार न दिल्याने हे प्रकरण मिटले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता वर्धात चक्क जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याने आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी असुरक्षित असल्याचे सिद्ध होत आहे. यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आता सहनशिलता संपली आहेवर्षभरापासून राज्यात सर्वत्रच आमची यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. जीव धोक्यात घालण्यासह तणावात काम केले जात आहे. अशा स्थितीत आम्हाला आधार देण्याऐवजी अपामानास्पद वागणूक देण्यासह शिवीगाळव जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता आम्ही शांत बसणार नाहीत. संंबंधित आमदारांवर कडक कारवाई झाली नाही तर राज्यातील सर्व आरोग्य सेवा बंद करू. आता सहनशिलता संपली आहे.- डॉ.आर.बी.पवार, अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना, महाराष्ट्र