शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

परळी रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाला गती; दुहेरीकरण व यार्डाच्या कामांची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 3:04 PM

विभागीय रेल्वे व्यवस्थापक भरतेशकुमार जैन यांनी परळी रेल्वे स्टेशनची पाहणी करून विकासकामांची तपासणी केली.

परळी: परळी येथील रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचे काम सध्या जोरात सुरू असून, स्टेशनच्या विकासकामांसाठी आणखी निधी उपलब्ध होणार आहे. तसेच, परळी-परभणी रेल्वे मार्गावरील दुहेरीकरण व रेल्वे यार्डाचे काम देखील करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक भरतेशकुमार जैन यांनी दिली.

बुधवारी सकाळी ९ वाजता विभागीय रेल्वे व्यवस्थापक भरतेशकुमार जैन यांनी परळी रेल्वे स्टेशनची पाहणी करून विकासकामांची तपासणी केली. त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेची खात्री करून घेतली आणि स्टेशनमध्ये चालू असलेल्या बांधकामाचे बारकाईने निरीक्षण केले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी-परभणी मार्गावरील दुहेरीकरण आणि रेल्वे यार्डाच्या कामासाठी परळी परिसरातील जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया काहीशी वेळ घेईल, परंतु हे काम निश्चितपणे पूर्ण होईल. तसेच, स्टेशनच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी आणखी निधी उपलब्ध होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

या दौऱ्यात रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. संघटनेचे अध्यक्ष जी.एस. सौंदळे, प्रासत्यनारायण दुबे, विजया दहिवाळ, कैलास तांदळे, सोमनाथ निलंगे, सुधीर फुलारी, मकरंद नरवणे, राजेश कांकरिया, रमणीक पटेल, शिरीष सलगरे, हिरालाल बोरा, अनिल मिसाळ यांची उपस्थिती होती. याशिवाय, अश्विन मोगरकर व प्रा. प्रवीण फुटके यांनीही रेल्वे कामांबाबत चर्चा केली. यादरम्यान, आर.पी.एफ. पोलीस निरीक्षक प्रल्हाद मीना, पोलीस उपनिरीक्षक किशोर मलकुनाईक, तिकीट तपासणी अधिकारी राजेश आणि किशोर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रवासी संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या:- नांदेड-पनवेल रेल्वेगाडीच्या बोगी वाढवणे- मछलीपट्टणम-बीदर, सिकंदराबाद-बीदर इंटरसिटी, यशवंतपूर-बीदर एक्सप्रेस, पाटणा-पूर्णा, रायचूर-परभणी गाड्या परळी-वैजनाथपर्यंत विस्तारित कराव्यात  - दिवाळी सणानिमित्त विशेष रेल्वे सुरू करणे- पूर्णा-परळी रेल्वे लातूर-धाराशिव किंवा उदगीर-बीदरपर्यंत विस्तारित करावी  - अमरावती-पुणे व कोल्हापूर-नागपूर रेल्वे दररोज सुरू करावी- घाटनांदूर, वडगाव (निळा) येथे विनाकारण होणारे रेल्वे थांबे टाळावेत  - परळी रेल्वे स्टेशनमधील आरक्षणाची वेळ वाढवावी

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीड