आष्टी : अहमदनगर -बीड या मार्गावर आष्टी ते साबलखेड पर्यंत राहिलेल्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवताना वाहनचालकांचा तोल जाऊन दररोज अपघात होत आहे. या रस्त्यावर २८ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकी आणि कारचा अपघात झाला.
दोन तरुण अहमदनगर येथून भूम तालुक्यातील पाथरूड येथे दुचाकीने जाताना कड्याजवळ हॉटेल अमर पॅलेस येथील वळणावर खड्डा चुकवताना अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कड्याचे सरपंच अनिल ढोबळे कडा रोटरी क्लबची रुग्णवाहिका स्वतः चालवत अपघात स्थळी पोहोचले. तातडीने जखमींना अहमदनगर येथील खासगी दवाखान्यात पोहोच केले. अहमदनगर -बीड या मार्गावर आष्टी ते साबलखेड पर्यंत राहिलेल्या अर्धवट कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवताना वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होत आहे. अहमदनगर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता तारडे यांना खड्डे बुजवून घेण्यासाठी फोन केला असता लवकरच खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन आठ दिवसांपूर्वी दिले होते.
290721\29bed_2_29072021_14.jpg