बीड : न्यायालयात हजर करून बाहेर काढल्यानंतर हातकडी लावताना पोलिसांना चकवा देत आरोपीने पलायन केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्याला शुक्रवारी पहाटे 2 वाजता कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यात बेड्या ठोकल्या, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
अनिल सुनील पवार (२०, रा. शिंदेनगर, बीड) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद आहे. घटनेपासून तो येथील जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कोठडीत आहे. २ फेब्रवारी न्यायालयीन तारखेसाठी त्यास मुख्यालयातील तीन कर्मचाऱ्यांनी न्यायालयात आणले. न्यायाधिशांसमोर हजर करून बाहेर आल्यानंतर हातकडी लावताना त्याने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पलायन केले. त्यांनतर त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. तो कर्नाटक मध्ये ऊसतोडणीसाठी गेलेल्या नातेवाईककडे असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली. तात्काळ पथक रवाना करून पहाटे 2 वाजता त्याला बेड्या ठोकल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबरमे, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी दराडे, विष्णू चव्हाण, नरेन्द्र बांगर, विकी सुरवसे आदींनी केली.