शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

बीड जिल्ह्यात ग्रामीण शाळांत ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर १९ गुरुजींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 11:58 PM

बीड : तालुक्यातील डोंगरदरी, दुर्गम भागातील शाळांची अचानक तपासणी केल्यानंतर सुटीच्या दिवशी सुनावणी घेत १९ गुरूजींवर विविध स्वरुपाची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर कमी पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे पालकांशी चर्चा करून जवळपासच्या चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.डोंगरदऱ्यांतील तसेच दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असते. तरीही दोन शिक्षक नियुक्त ...

बीड : तालुक्यातील डोंगरदरी, दुर्गम भागातील शाळांची अचानक तपासणी केल्यानंतर सुटीच्या दिवशी सुनावणी घेत १९ गुरूजींवर विविध स्वरुपाची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर कमी पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे पालकांशी चर्चा करून जवळपासच्या चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

डोंगरदऱ्यांतील तसेच दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असते. तरीही दोन शिक्षक नियुक्त असतात. परंतू या शाळांची गुणवत्ता ढासळत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आले. एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतींची झाडाझडती घेण्यात आली होती. यावेळी दुर्गम भागातील काही शाळा बंद असल्याचे तर काही शाळांमध्ये शिक्षक गायब तर काही ठिकाणी मुलांची गुणवत्ता कमी असल्याचे दिसून आले होते. शितावरून भाताची परीक्षा झाल्याने बीड तालुक्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची तपासणी अतिशय गुप्तता राखून करण्यात आली.

सायंकाळी सात वाजता विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना शनिवारी सकाळी ७ वाजता जिल्हा परिषदेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले. शनिवारी सकाळी साडेसात वाजता बीड तालुक्यातील १० पेक्षा कमी पटसंख्येचया २० शाळांची तपासणी करण्यासाठी १० विस्तार अधिकारी निघाले. शाळांची नावे त्यांना त्याच वेळी समजली, त्यामुळे शिक्षकांना हा एक सर्जिकल स्ट्राइक ठरला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निर्देशानुसार तेथील माहिती संकलित करुन अहवाल सादर केले. दुसºयाच दिवशी कारवाई करण्यात आली. आता बीडनंतर कोणत्या तालुक्यात तपासणी होणार आहे, याकडे लक्ष लागले आहे.गुणवत्ता ढासळली, दांडीयात्राहीशनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर २० पैकी १३ शाळांमध्ये शिक्षक उपस्थिती, शाळा वेळेत उघडणे, गुणवत्ता याबाबत असमाधानकारक स्थिती आढळली. ४ शाळा वेळेवर उघडल्या नव्हत्या. ३ शाळा बंद आढळून आल्या. ५ शिक्षक अनधिकृत गैरहजर आढळून आले. तर पाच शिक्षकांच्या रजा होत्या मात्र त्यांच्या अर्जात त्रुटी होत्या.

शनिवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी १३ शाळांतील १९ शिक्षकांना गैरवर्तणुकीबाबत नोटीस दिल्या. व रविवारी खुलाशासह सुनावणीसाठी समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तसेच तपासणी अधिकारी, केन्द्र प्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापकांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.रविवारी दुपारी १ वाजता संबंधितांनी खुलासे दिले. त्याचे अवलोकन केल्यानंतर सुनावणी झाली. प्रत्येक शिक्षकाने आपले म्हणणे मांडले. त्याबाबत तपासणी अधिकाºयांकडून शहानिशा करण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण झाली.

टॅग्स :BeedबीडTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाMarathwadaमराठवाडा