तलवाडा पोलीस, सरपंच, ग्रामसेवकांनी ही मोहीम राबवीत दंडात्मक कारवाई करत मास्क वापरण्याच्या तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तो रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश उनवणे तसेच सिरसदेवी ग्रामपंचायतीद्वारे केल्या होत्या. मात्र, तरीसुद्धा बहुतांश लोक विना मास्क फिरत आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळी सिरसदेवी येथे व्यापारी तसेच विना मास्क फिरणाऱ्या २५ जणांवर दंडात्मक कारवाई करत दोनशे ते पाचशे रुपये दंड आकारण्यात आला. सपोनि सुरेश उनवणे याच्या मार्गदर्शनाखाली सिरसदेवीचे सरपंच रवींद्र गाडे, ग्रामसेवक देवकर, बीट अंमलदार शाम तोंडे, रमेश भोले, शेख महंमद, तालेब सय्यद, कादरी, गणेश शिंदे, मनोहर गाडे, आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
===Photopath===
250221\sakharam shinde_img-20210225-wa0023_14.jpg