शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
2
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
3
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
5
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
6
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
7
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
8
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
10
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
11
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
12
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
13
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
14
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
15
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
16
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
17
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
18
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
19
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
20
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!

केजमध्ये ४० वीजचोरांवर कारवाई, २७ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 6:45 PM

केज तालुक्यात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने केज उपविभागातील सहा शाखेत रोहित्र जळणे व नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ

ठळक मुद्दे कुणी आकडे टाकले, तर कुणी मीटरमध्ये केली छेडछाड

केज : तालुक्यात वीजचोरी वाढल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली. वीजगळतीच्या प्रमाणात वाढ झाल्याने केज विद्युत वितरण कंपनीने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम चालू केली आहे. वीजचोरी करणाऱ्या ४० जणांविरुद्ध कारवाई करत ३ लाख ८७ हजार ३९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर २७ जणांविरुद्ध वीजचोरी केल्याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतला दिली.

केज तालुक्यात वीजचोरी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने केज उपविभागातील सहा शाखेत रोहित्र जळणे व नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यास सुरवात करत केज तालुक्यातील नायगाव सुकळी येथे सहा, आवंढ शिरपुरा येथे दहा, भालगाव येथे चार, बावचीत एकावर तर कवडगाव येथे एका वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध वीजचोरी केल्याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर केज शहरातील सात विद्युतग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली आहे. या सात ग्राहकांनी विद्युत मीटरमधून वीज चोरी केल्याचे आढळून आल्याने त्यांना दंडाची आकारणी करण्यात आली आहे. दंडाचा भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कारवाई विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कोलप यांच्या मार्गदर्शनाखाली केज विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर, सहायक अभियंता अमोल मुंडे, सचिन चव्हाण, रोशन रामेकर, रामराव नाकाडे व केज उपविभागातील वीज कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मोहीम सुरूच राहणारतालुक्यात ४० लोकांवर कारवाई करत ३ लाख ८७ हजार ३९० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर २७ जणाविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यात या पुढेही वीजचोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मोहीम चालूच राहणार असल्याचे केज विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणBeedबीड