शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

स्वत:कडे २८ कोटींची वीज थकबाकी ठेवून सामान्यांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:31 AM

बीड नगर परिषदेचा असाही कारभार : महावितरणने वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सध्या मार्च अखेरमुळे ...

बीड नगर परिषदेचा असाही कारभार : महावितरणने वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : सध्या मार्च अखेरमुळे सर्वच कार्यालये थकबाकी वसुलीवर भर देत आहेत. यात बीड पालिका व महावितरणचाही समावेश आहे. पालिकेने सामान्यांना कारवाईची भीती दाखवत कर वसुली सुरू केली आहे. वास्तविक पाहता पालिकेकडेच महावितरणची तब्बल २८ कोटींची थकबाकी आहे. महावितरणने वारंवार पत्रव्यवहार करूनही पालिकेने अद्याप ती भरलेली नाही.

बीड नगर परिषद सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांनी कर भरला नाही. नळपट्टी, घरपट्टी व इतर मालमत्ता करापोटी शहरवासियांकडे जवळपास १५ कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. आता मार्च अखेरमुळे पालिकेने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर वसुलीवर भर दिला आहे. नागरिकांना नोटीस बजावल्या जात आहेत. कर वसुलीसाठी वेगवेगळे विभाग करून करवसुली केली जात आहे. एकीकडे पालिका कर वसुलीवर भर देत असली, तरी स्वत:कडील इतर विभागांची थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. केवळ पाणी पुरवठ्याची पालिकेकडे २८ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. मागील अनेक वर्षांपासून महावितरणने ही थकबाकी भरण्यासाठी पत्र पाठवले, परंतु याला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. आता देयकावर व्याज वाढत गेल्याने ही रक्कम दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.

महिन्याकाठी ४० लाख रुपये बिल

बीड शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. तसेच इट येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या सर्व ठिकाणी महिन्याकाठी जवळपास ४० लाख रुपयांचे बिल पालिकेला येते. पालिकाही आलेले बिल भरते. परंतु, जुनी थकबाकी भरण्यास हात आखडता घेत आहे.

कोट

बीड नगरपालिकेकडे २८ कोटींची थकबाकी आहे. ती भरण्यासाठी वारंवार पत्र पाठवले जात आहे.

रवींद्र कोळप

अधीक्षक अभियंता, महावितरण, बीड

कोट

जुनी थकबाकी आहे. रेग्युलर बिल प्रत्येक महिन्याला भरले जाते. जुनी थकबाकी असल्याने व्याज वाढत असून, थकबाकीचा आकडाही वाढत आहे.

कोमल गावंडे

अभियंता, विद्युत विभाग, न. प., बीड

पालिकेकडे पाणी पुरवठ्याची थकबाकी

काडीवडगाव पाणी पुरवठा - १३ कोटी ८६ लाख ५४ हजार ९२८

पिंपळगाव पाणी पुरवठा - १४ कोटी २९ लाख ३८४

नगर परिषद इमारत - २ लाख ४७ हजार ३४८