नागरिकांनी कोरोनाचे नियमाचे काटेकोर पालन करावे नसता दंडात्मक कडक कारवाई केली जाईल असे आावाहन सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी केले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना तो रोखण्यासाठी नागरिकांनी नियमाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. धारुर पोलिसांनी धारूर व आडस येथे नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरूध्द कारवाया करण्यात आल्या. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या २१ जणांकडून ४ हजार ५०० रूपये दंड वसूल केला. २० दुचाकी स्वारांविरूध्द कारवाई करून ३ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. आडस येथे ७ जणांवर कारवाई करीत १४०० रूपये दंड वसूल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे, पो. कॉ. भालेराव, मिसाळ यांनी ही मोहीम राबवली.
नागरिक, व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून दंडात्मक कारवाई टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
===Photopath===
200221\img-20210220-wa0114_14.jpg