बीड : जिल्हा गौण खनिज अधिकारी यांच्या पथकाने केज तालुक्यातील सुर्डी व सोने सांगवी शिवारात बुधवारी दुपारी कारवाई केली. यावेळी ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त करण्यात आल्या. तर, एक ते दीड हजार ब्रास मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी चार टिप्पर व एक पोकलेन ताब्यात घेण्यात आले आहे.
अंबाजोगाई विभागाच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्याकडे केज तालुक्यात मांजरा नदीतून वाळू उपसा व मुरुम उत्खनन केले जात आहे. तहसीलदार दुलाजी मेंडके यांना माहिती असताना देखील कारवाई केली जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंजुषा मिसकर यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी तथा नायब तहसीलदार टी.एस आरसूळ यांना पथकासह छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी पथकातील कर्मचारी हर्षद कांबळे, नितीन जोगदंड, संदीप खरुद यांना सोबत घेऊन केज तालुक्यातील सुर्डी येथे छापा टाकला. यावेळी मांजरा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाटी मोठ्या सक्शन पंपासह बोटींचा वापर केला जात असल्याचे समोर आले. या दोन्ही बोटी प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तर, केज ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान सुर्डी व सोनेसांगवी शिवारात अवैधरित्या मुरुम उत्खनन वाहतूक सुरु असल्याची माहिती पथकाला मिळताच त्याठिकाणी कारवाई करून ४ टिप्पर व १ पोकलेज जप्त केले.
===Photopath===
210421\21_2_bed_22_21042021_14.jpg
===Caption===
सुर्डी येथील मांजरा नदीपात्रातून बोटीच्या मदतीने वाळू उपसा करणऱ्या बोटी पाण्यातून बाहेर काढता अधिकारी कर्मचारी