लोकमत न्यूज नेटवर्कतलवाडा : गेवराई तालुक्यातील राजापुर येथील गोदापात्रात बोटीद्वारे सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यात आली. यामध्ये बोटीसह पोकलेन व दोन मोटारसायल असे लाखोंचे साहित्य जप्त केले आहे. मागील अनेक दिवसांपासून ही वाळू वाहतूक होत असल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील राजापूर येथील वाळू साठे विभागीय आयुक्तांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच जप्त करुन लिलाव केला होता. त्या लिलावातील वाळू उचलल्यानंतरही बोटीद्वारे वाळूचा सर्रास उपसा सुरूच होता. गोदाकाठावरील एका शेतकºयाच्या शेतातून हा वाळू उपसा सुरु होता. याबाबतीत हाकेच्या अंतरावर असणारे तलवाडा ठाणे व महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते. परंतु शनिवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी कारवाई केली.
यामध्ये एका बोटीसह पोकलेन व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. यातील बोट जिलेटीनद्वारे नष्ट करण्यात आली आहे. यावेळी महसूलचे नायब तहसीलदार अभय जोशी, मंडळ अधिकारी ए. एस. कूरुलकर, आर. एल. माने, तलाठी ए.ए. गायकवाड, शेख सत्तार, पोलीस उपनिरीक्षक राजेश गढवेसह इतर उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
२५५० ब्रास वाळूचे गौडबंगालया गावात २५५० ब्रास वाळू जप्त केली होती. परंतू ती चोरीला गेलेली असल्याने तहसीलदारांसह महसूल प्रशासन अडचणीत सापडले आहे. यामध्ये जुळवाजुळव करण्यासाठी अधिकाºयांची धावाधाव करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.