कुंपणच शेत खातेय : महिला पोलीस कर्मचा-याच्या पतीसह इतरांवर गुन्हेलोकमत न्यूज नेटवर्कबीड : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर बीड ग्रामीण पोलिसांनी गस्तीच्या दरम्यान पांगरबावडी येथे मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पकडला. याप्रकरणी चालक व मालक यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर असताना, पांगरबावडी परिसरातून एक हायवा टिप्पर (एमएच-१२ पीक्यू-५९२३) अवैधरित्या वाळू वाहतूक करत होता. पोलिसांनी टिप्पर थांबवून पावती व इतर कागदपत्राची माहिती मागितली तसेच चौकशी केली. मात्र, चालकाकडे पावती आढळून आली नाही. तसेच विनापरवाना साडेपाच ब्रास वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले.याप्रकरणी चालक शेख यासीन शेख खाजा व मालक रवी सर्जेराव गायकवाड, सुनिल खरवाडे, यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि.सुजित बडे, श्रीपती मस्के, पोशि.दिनेश ढाकणे यांनी केली.वाळू प्रकरण गाजत असताना पोलीस पतीचा अवैध धंदा होता सुरूबीड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केलेले टिप्पर हे एका पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला पोलीस पतीचे असल्याची सूत्रांची माहिती आहे. याच कारणामुळे वाळू प्रकरण गाजत असताना तसेच रात्री परवानगी नसताना अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात होती. अशा प्रकारे अनेक दिवसांपासून अवैध वाहतूक केली जात होती.अशाच प्रकारे पोलीस, महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाºयाचे भागिदारीमध्ये वाळू वाहतूक करण्यासाठी टिप्पर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:39 PM