माजलगाव : तालुक्यातील सरवर पिंपळगाव शिवारातील एका शेतात तिर्रट खेळत असताना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बीडच्या विशेष पथकाने छापा टाकून ५२ हजार रोख रकमेसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव- पाथरी तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या सरवर पिंपळगाव येथे शेतात तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याची खबर मिळाल्यानंतर बीड येथील विशेष पथकाने सापळा रचत मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चुन्नूखाँ नूरखाँ पठाण यांच्या शेतात छापा टाकून १४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळ असलेल्या मुद्देमालात नगदी ५२ हजार २०० रुपयांसह मोबाइल हँडसेट, मोटारसायकल मिळून ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून ४ लाख १६ हजार २०० रुपये जप्त केले. या १४ जणांविरुद्ध पोलीस शिपाई समशेर खान यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
जुगार खेळणाऱ्यांमध्ये माजलगाव तालुक्यातील गणेश रामकिसन गोरे, रा. पिंपळगाव, अलिमोदीन शिराजोदीन शेख, रा. सोमठाणा, चुनूखॉ नुरखाँ पठाण, रा. पिंपळगाव, नवनाथ हरिभाऊ लिंबोरे, रा. सोमठाणा, फेरोजखॉन फत्तेखॉन पठाण, रा. सोमठाणा, रुस्तुमखाॅन दौलतखॉन, रा. सोमठाणा, प्रभाकर सखाराम जाधव, रा. चिंचोली, डिगांबर सीताराम मुळे, रामपुरी, सिधीखॉन लालखॉन पठाण, रा. सोमठाणा, विलास गणपतराव सोळंके, रा. गंगामसला, प्रकाश बाबासाहेब शेजूळ, रा. आबेगाव, तर पाथरी तालुका, जि. परभणी येथील अंगद विष्णू शिंदे, रा. ढालेगाव, राजेश विश्वनाथ कांबळे, रा. गौतमनगर, पाथरी, कृष्णा शेषेराव कांबळे, रा. पाथरी यांचा समावेश आ