: मास्क न वापरणे पडणार महागात
वडवणी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहरातील व ग्रामीण भागातील ८४ दुचाकीचालकांवर कारवाई करून ४२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालवण्यासाठी वाहनधारकांना वेळोवेळी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहनधारक यांना वाहतुकीचे नियम सुरक्षित वाहतुकीचे धडे दिले जात आहेत. वर्षभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. शहरासह ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था बेकायदेशीर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वडवणी ठाण्याचे सपोनि नितीन मिरकर, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस उपनिरीक्षक एम.डी. शेख, पोलीस नाईक, ए, एन. आघाव, गंगावणे लखन, एन. आर. ढाकणे, विलास खरात, सी. के. माळी राम बारगजे, शरीफ शेख यांनी तीन दिवसात विनामास्क ८४ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई केली. मोटार वाहन कायदा तसेच भादंविनुसार विविध कलमाप्रमाणे ही कारवाई करण्यात आली. रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना व बाजारपेठेत किंवा गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाऊ नये. मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे सपोनि नितीन मिरकर म्हणाले.
पोलिसांची कसरत
तालुक्यातील तब्बल ४८ गावांसाठी एकच पोलीस ठाणे असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. मात्र शहरात विनामास्क आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना कसरत करावी लागत आहे.
===Photopath===
140321\rameswar lange_img-20210314-wa0004_14.jpg
===Caption===
वडवणी येथे विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीचालकांसह अन्य वाहनांवर पोलीस कारवाई करीत आहेत. तीन दिवसात ८४ वाहनधरकांवर कारवाई करण्यात आली.