कडा : टाकळी अमिया येथील गट.नं. २११ मधील शासकीय गायरान जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे तहसीलदारांनी ११ सप्टेंबरला स्थळपाहणीत निदर्शनास आले आहे. येथील बेकायदेशीर अतिक्रमण सात दिवसांत काढावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे महसूल विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ जणांना नोटीसदेखील देण्यात आली आहे, अशी माहिती मंडलाधिकारी एस. एन. गवळी यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील गट. नं. २११ मधील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचे तहसीलदार व इतर अन्य अधिकारी यानी ११ सप्टेंबरला केलेल्या पाहणीत आढळून आले. याच जमिनीवर हक्क सांगण्यावरून वाद निर्माण होत असतानाच आता महसूल प्रशासनाने संबंधित हक्क दाखवणाऱ्या ३१ लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत अतिक्रमण काढून घ्या, नसता शासननियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीमध्ये नमूद केले आहे.
..
गायरानावर हक्क न सांगताच दिली नोटीस
कडा येथील अशोक जाधव, दीपक जाधव, किरण आखाडे यानी आजपर्यंत टाकळी अमिया येथे एक गुंठा गायरानावरदेखील अतिक्रमण केले नाही तरीदेखील त्यांना महसूल विभागाने अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे.