बीड : खरीप हंगाम पेरणी काळ जवळ येत आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांची मशागत प्रक्रिया सुरु आहे. तसेच पेरणीसाठी व लागवडीसाठी वापण्यात येणारे बियाणे नकली आहेत का ? शेतकऱ्यांनी रितसर प्रक्रिया करुन योग्य भावात विक्री केली जाते का ? यासाठी कृषी विभागाकडून विविध कृषी सेवाकेंद्राची तपासणी केली जात आहे. या तपासणीमुळे बियाणे व खातांमध्ये शेतकºयांची फसवणूक होणार नाही. बीड येथील मोंढ्यात गुरुवारी कृषी अधिकाºयांनी तपासणी केली असता एका दुकनात तफावत आढळून आली असून, विक्रीबंदीची कारवाई करण्यात आली आहे.मागील वर्षी काही ठिकाणी सोयबीन व कापूस पिकांचे नकली बियाणे बाजारात विक्रीसाठी आल्याने शेतकºयांचे नुकसान झाले होते. शेतकºयांची बियाणांमध्ये होणारी फसवणूक टळण्यासाठी कृषी विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. तसेच जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या कृषी सेवा केंद्रांची तपासणी करुन बियाणांचे नुमने, खतांचे नमुने, तसेच दुकानदारांनी केलेल्या नोंदी याची तपासणी केली जात आहे. खते व बियाणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवले जात असून, बिले व इतर नोंदी तपासून यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जात आहे.गुरुवारी बीड येथील मोंढा भागात असलेल्या कृषी सेवा केंद्रावर जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी करण्यात आली. यावेळी बियाणे, खताचे नमुने तसेच रासायनिक औषधांची अंतिम तारीख व खरेदी विक्रीची अभिलेखे तपासले. यावेळी मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. खते, बियाणांची नियमाप्रमाणे साठवणूक न करणे, शेतकºयांना विक्री केलेल्या मालाच्या पक्क्या पावत्या न देणे, पावतीवर लॉट नंबर न टाकणे, यासह इतर कारणांस्तव त्या कृषीसेवा केंद्र चालकाला विक्रीबंदीची कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई जिल्हा कृषी अधिक्षक राजेंद्र निकम, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, गणनियंत्रण निरीक्षक लक्ष्मीकांत कागदे, जि.प. कृषी अधिकारी जी.बी.कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी घेणार मुख्य विके्रत्यांची बैठक४खरीप हंगामाच्या पार्श्वभूमिवर कृषी सेवा केंद्रातील मुख्य वितरक, कंपनीचे प्रतिनिधी, अधिकाºयांची बैठक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे शुक्रवारी घेणार आहेत.४बियाणे, खते व इतर विषायांसंबंधी चर्चा होणार असून काही सूचना देखील यावेळी दिल्या जाणार आहेत.
नकली बियाणे विकल्यास होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:23 AM
खरीप हंगाम पेरणी काळ जवळ येत आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांची मशागत प्रक्रिया सुरु आहे. तसेच पेरणीसाठी व लागवडीसाठी वापण्यात येणारे बियाणे नकली आहेत का ? शेतकऱ्यांनी रितसर प्रक्रिया करुन योग्य भावात विक्री केली जाते का ? यासाठी कृषी विभागाकडून विविध कृषी सेवाकेंद्राची तपासणी केली जात आहे.
ठळक मुद्देकृषी विभागाची तपासणी मोहीम : जिल्हाधिकारी घेणार सर्व मुख्य वितरकांची बैठक