लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमधील (बिगर अल्पसंख्यांक संस्था) अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया अखेर रविवारी समुदेशन व इनकॅमेरा पार पडली. माध्यमिक विभागातील ४२ व प्राथमिक विभागातील १० अशा ५२ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे.शासनाच्या निर्देशानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने खाजगी संस्थांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया मागील आठवड्यापासून सुरु झाली होती. सुरुवातीला माध्यमिक भिवागातील ७९ तर प्राथमिकचे १२ शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती पुढे आल्यानंतर ४ व ५ डिसेंबर रोजी आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या, त्यानंतर संबंधित संस्था व शिक्षकांच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आले होते. तर ७ डिसेंबर रोजी होणारे समायोजन काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले. दरम्यान ८ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडून रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.अखेर ९ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत समुपदेशन पध्दतीने समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. चार तास चालेल्या समायोजन वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे (मा.), राजेश गायकवाड (प्रा.), डायटचे घुले, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मोहन काकडे, विठ्ठल राठोड इतर अधिकारी तसेच संस्थांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक, अतिरिक्त शिक्षक उपस्थित होते.
५२ अतिरिक्त खाजगी शिक्षकांचे समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:13 AM