प्लंबिंगचे काम करून गांधीगिरी : कोविड सेंटरचा पाणीप्रश्न मार्गी
धारूर
: येथील जिल्हा परिषद मुलींच्या वसतिगृहातील पाण्याचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन केले. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कायाकल्प फाउंडेशनच्या वतीने प्लंबिंगचे काम करत हा पाणीप्रश्न तातडीने सोडविला. किमान आतातरी प्रशासकीय यंत्रणेने स्वत:ची जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
धारूर शहरालगत सारूकवाडी रोडवर दोन कोविड केअर सेंटर आहेत. जि. प. मुलींच्या वसतिगृहात असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये पाण्याची समस्या असल्याने तसेच पाणी टाकीत जाण्याची सुविधा नसल्याने येथील रुग्णांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. पाणी आणण्याच्या नावाखाली हातात बाटली घेऊन शौचालयास जाण्याचे कारण सांगत महिला व पुरूष रूग्ण सर्रास बाहेर येत होते. कोविड केअर सेंटरबाहेर कोरोनाबाधित रूग्ण नातेवाईकांसोबत गप्पा मारताना आढळतात तर अनेक रूग्ण या भागातून वावरतात. ही बाब येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाकडे तक्रार केली. पाणीप्रश्नाचे कारण सांगून रूग्ण बाहेर फिरतात याबीबकडे कानाडोळा करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन समितीने याकडे लक्ष देणे गरजेचे असताना तहसीलदारांनी याबाबत गंभीर भूमिका घेतली नाही. नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. कोविड केअर सेंटरच्या इमारतीवर तांत्रिक अडचणींमुळे पाणी वर चढत नव्हते. ही सर्व परिस्थिती पाहून सामाजिक दायित्व म्हणून कायाकल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्लबिंग साहित्य स्वतः आणून व प्लबिंग काम करून पाणी वर चढविले. दिनेश कापसे, बबन वाघमारे,बाबराय चाटे यांनी स्वतः हे काम पूर्ण केले. यावेळी सय्यद शाकेर यांनी येथे थांबून हा प्रश्न मार्गी लावला. हे पाणी वर जाण्याची समस्या दूर केली. आता यापुढे रूग्णांना सेंटरबाहेर जाण्यासाठी प्रतिबंध करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धारूर शहरालगत सारूकवाडी रोडवर दोन कोविड केअर सेंटर आहेत. जि. प. मुलींच्या वसतिगृहात असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये पाण्याची समस्या असल्याने तसेच पाणी टाकीत जाण्याची सुविधा नसल्याने येथील रुग्णांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. पाणी आणण्याच्या नावाखाली हातात बाटली घेऊन शौचालयास जाण्याचे कारण सांगत महिला व पुरूष रूग्ण सर्रास बाहेर येत होते. कोविह केअर सेंटरबाहेर कोरोनाबाधित रूग्ण नातेवाईकांसोबत गप्पा मारताना आढलतात. तर अनेक रूग्ण या भागातून वावरतात. ही बाब येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाकडे तक्रार केली. पाणी प्रश्नाचे कारण सांगून रूग्ण बाहेर फिरतात याबीबकडे कानाडोळा करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन समितीने याकडे लक्ष देणे गरजेचे असताना तहसीलदारांनी या बाबत गंभीर भूमिका घेतली नाही. नगरपरीषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. कोविड केअर सेंटरच्या इमारतीवर तांत्रिक अडचणींमुळे पाणी वर चढत नव्हते. ही सर्व परिस्थिती पाहून सामाजिक दायित्व म्हणून कायाकल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्लबिंग साहित्य स्वतः आणून व प्लबिंग काम करून पाणी वर चढवले. दिनेश कापसे , बबन वाघमारे,बाबराय चाटे यांनी स्वतः हे काम पूर्ण केले. यावेळी सय्यद शाकेर यांनी येथे थांबून हा प्रश्न मार्गी लावला. हे पाणी वर जाण्याची समस्या दूर केली. आता यापुढे रुग्णांना सेंटरबाहेर जाण्यासाठी प्रतिबंध करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
===Photopath===
170521\img-20210516-wa0159_14.jpg~170521\img-20210516-wa0158_14.jpg