प्रीतम मुंडे : भाजपतर्फे जिल्हा प्रशासनाकडे एक हजार पीपीई कीट सुपूर्द
बीड : बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, रेमडेसिविरची कृत्रिम टंचाई होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच जिल्हा भाजपच्या वतीने एक हजार पीपीई कीटदेखील जिल्हाधिकारी यांच्याकडे यावेळी सुपूर्द करण्यात आल्या.
रविवारी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आरोग्य सुविधांमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या, त्या प्रत्येक ठिकाणी सुधारण्याच्या सूचना दिल्या. काही कोविड सेंटरमध्ये अतिशय गलथान कारभार असल्याचे चित्र समोर दिसून आले. तो सुधारणे गरजेचे असल्याचे मत प्रीतम मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, चुकीचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, विशेषतः रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार जिल्ह्यातही चालू आहे. यामुळे कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल व आर्थिक लूट चालू आहे. रेमडेसिविरची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व आरोग्य प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचना देखील यावेळी त्यांनी केल्या.
दरम्यान, वैद्यकीय उपकरणे व साहित्य यांच्या टंचाईमुळे साहित्याचा पुरवठा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था व व्यक्तींनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून एक हजार पीपीई कीट खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहांगीर, स्वप्निल गलधर, अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, संग्राम बांगर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष सोहनी, प्रमोद निणाळ, पिंगळे, बद्रीनाथ जटाळ, अमोल वडतिले, संदीप उबाळे, दीपक थोरात, आदी उपस्थित होते.
===Photopath===
180421\310518_2_bed_14_18042021_14.jpeg
===Caption===
पीपीई कीट सुपूर्त करताना खा.प्रीतम मुंडे जिल्हाधिकारीरविंद्र जगताप आदी,