या स्पर्धेचे उदघाटन माजलगाव छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी माजी सरपंच दिलीपराव कोमटवार, संतोष यादव, माजी जि प सदस्य विलासराव बड़े, सरपंच अजय कोमटवार, सरपंच श्रीनिवास मोरे, सेवा सह सोसायटी चेअरमन राम उबाळे, शिवसेना नेते नारायण चांदबोधले, संजय शिंदे, ग्रामसेवक नवनाथ पवार, अतुल चव्हाण, मधुकर देशमाने, राजेभाऊ कटारे,भारत गौंडर, अतुल सोळंके, अशोक काशिद, विठ्ठल महाजन आदी उपस्थित होते. अविनाश दळवे, राम घोड़के, अलीम सय्यद, तुषार देशमाने, अनिल मांयदळे, अश्विन राउत सह दिंद्रुड येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजलगाव, धारुर, वडवणी, परळी तालुक्यातील बहुतांश संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.