शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
4
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
5
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
6
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
7
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
8
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
9
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
12
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
13
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
14
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
16
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
17
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
18
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
19
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
20
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

कायदे-नियमांचा अंगिकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:08 AM

व्यापार क्षेत्रातील बदलत्या कायद्यांचा आणि नियमांचे ज्ञान घेऊन त्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : व्यापारी हा मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यावरच ईथला रोजगार अवलंबून आहे. व्यापार क्षेत्रातील बदलत्या कायद्यांचा आणि नियमांचे ज्ञान घेऊन त्याचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी केले.बीड शहर, तालुका व जिल्हा व्यापारी महासंघ व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विद्यमाने अन्न नोंदणी व अन्न व्यापार परवाना नोंदणी मार्गदर्शन शिबीर तसेच मेळाव्यात बोलत होते. मंचावर अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे,सहाय्यक आयुक्त रामेश्वर डोईफोडे, अन्न सुरक्षा अधिकारी ऋ षिकेश मरेवार, अनिकेत भिसे, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अरु ण बरकसे, व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी,जवाहर कांकरिया, अशोक शेटे, विनोद पिंगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद पिंगळे यांनी केले. मेळाव्याला जिल्हाभरातून व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.१५००० नोंदणी अन् १५०० परवानेदिवसभरात १५० व्यापारी, व्यावसायिकांनी अन्न परवान्याची नोंदणी केली. मेळाव्यात उपस्थित व्यापाऱ्यांपैकी बहुतांश जणांनी याआधीच अन्न नोंदणी व अन्न परवाने काढलेले होते.१२ लाखांच्या आतील वार्षिक उलाढाल असलेल्या जवळपास १५ हजार व्यावसायिकांनी नोंदणी तसेच १२ लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या १५०० व्यावसायिकांनी आतापर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेतल्योच सूत्रांनी सांगितले.अन्न नोंदणी आवश्यक१२ लाखाच्या आतील तसेच जास्त वार्षिक उलाढाल असणाºया खाद्य पदार्थ व्यवसायिकांनी नोंदणी करणे व परवाना बंधनकारक आहे. १२ लाखाच्या आतील व्यवसायिकांना नोंदणीसाठी फॉर्म - ए, पाच वर्षांचे शुल्क ५०० रुपये, ओळखीचा पुरावा, फोटो, जागेचे पीटीआर, सातबारा, किरायाने असल्यास मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असते.अन्न परवाना यांच्यासाठी१२ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणा-या खाद्यपदार्थ व्यावसायिकांना परवाना घेण्यासाठी फार्म- बी, वार्षिक शुल्क २००० रुपये फोटो, ओळखीचा पुरावा, जागेचा पुरावा, किरायाने असेल तर जागा मालकाचे नाहरकत व करारपत्राची प्रत,भागीदारी असेल तर पार्टनरशिप डिड तसेच जागेचा नकाशा ही कागदपत्रे आवश्यक असतात.अन्न सुरक्षा मानके कायद्याबाबत उपस्थितांना मान्यवरांचे मार्गदर्शनअन्न औषध प्रशासनाचे आयुक्त कृष्णा दाभाडे म्हणाले, अन्न पदार्थासंदर्भातील अन्न सुरक्षा मानके कायदा हा महत्वाचा कायदा आहे.रोजच्या जगण्यात या कायद्याचा संबंध आढळून येतो. यासाठीचा परवाना असल्याशिवाय सदरील व्यापार करता येत नाही.त्यासाठी सर्वांनी अन्न नोंदणी करावी आणि मोठया व्यवसायिकांनी अन्न परवाना घ्यावा, असे ते म्हणाले.व्यवसाय प्रकाराबाबत यावेळी माहिती देण्यात आली. काइन्ड आॅफ बिझीनेसमध्ये नोंद करताना व्यवसायातील खाद्यपदार्थाचा ठळक उल्लेख महत्वाचा असतो.तसेच काढलेला परवाना व्यवसाय स्थळी दर्शनी भागात लावणे आवश्यक असल्याचे यावेळी आयुक्त दाभाडे यांनी सांगितले.मेळाव्यात अन्न सुरक्षा मानके, या संदर्भातील कायदे, परवाने आदींची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागbusinessव्यवसायGovernmentसरकार