कडा : आमदारकीपासून तब्बल ५७ वर्षे दूर राहिलेल्या आजबे यांच्या घरात अखेर अनेक कठीण प्रवासानंतर शिराळसारख्या ग्रामीण भागात पुन्हा नव्याने आमदारकी मिळाली आहे. १९६२ साली आष्टी तालुक्यातील शिराळ सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी घराण्यातील भाऊसाहेब आजबे हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. तेव्हापासून आजपर्यंत आजबे घराणे राजकारणात असताना देखील आमदारकीपासून वंचित राहिले होते.२०१९ च्या या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांनी मोठ्या प्रमाणावर अटीतटीच्या लढतीत भाजपाचे भीमराव धोंडे यांना पराभूत करून तब्बल ५७ वर्षांपासून दूर असलेली आमदारकी सर्वसामान्य जनतेच्या जोरावर मिळवून आणली आहे. निवडणूक निकालानंतर बाळासाहेब आजबे यांनी कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली.
तब्बल ५७ वर्षानंतर आष्टी विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब आजबे यांच्या घरात आली आमदारकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:24 IST
आमदारकीपासून तब्बल ५७ वर्षे दूर राहिलेल्या आजबे यांच्या घरात अखेर अनेक कठीण प्रवासानंतर शिराळसारख्या ग्रामीण भागात पुन्हा नव्याने आमदारकी मिळाली आहे. १९६२ साली आष्टी तालुक्यातील शिराळ सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी घराण्यातील भाऊसाहेब आजबे हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते.
तब्बल ५७ वर्षानंतर आष्टी विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब आजबे यांच्या घरात आली आमदारकी
ठळक मुद्दे१९६२ ला वडील होते काँग्रेसचे आमदार : सर्वसामान्यांत मिसळणारे व्यक्तिमत्व