जिल्ह्यात मंगळवारी ४ हजार १९२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी २ हजार ७५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर १४३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ३२८ रुग्ण आढळले. अंबाजोगाई तालुक्यात २८०, आष्टी ७१, धारुर ६८,गेवराई १३०, केज १५०, माजलगाव ७०, परळी १२७, पाटोदा ३८, शिरुर १३८ व वडवणी तालुक्यातील ३९ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी ११४० जण कोरोनामुक्त झाले. आता एकूण रुग्णसंख्या ६१ हजार ६२ इतकी झाली असून आतापर्यंत ५३ हजार ३११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ६ हजार ७३६ जण कोरोनाशी झुंज देत असल्याची माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के.पिंगळे यांनी दिली.
चिंताजनक; मृत्यूसत्र थांबेना
दरम्यान, मंगळवारी ३७ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात अंबाजोगाई तालुक्यातील १३, आष्टी तालुक्यातील २, बीड तालुक्यातील ५, गेवराई तालुक्यातील ३, धारुर तालुक्यातील १, केज तालुक्यातील ३, माजलगाव १, परळी ८, वडवणी १ जणाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा १ हजार १५ इतका झाला आहे.