परळी : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परळी तहसीलसमोर गुरुवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तुर्तास मागे घेतल्याचे शुक्रवारी सायंकाळी आंदोलन कर्त्यांनी जाहीर केले. सकल मराठा समाजाने व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते.
मात्र तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील सकल मराठा समाजाचे साखळी आंदोलन अद्यापही चालूच आहे. आरक्षणावर निर्णय न झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा अजून तरी विचार नाही, असे शिवाजी शिंदे यांनी सांगितले. परळी शहरात दि. ८ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते.