कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत धारूर तालुक्यातील सोनीमोहा या ठिकाणी रब्बी हंगामात कांदा लागवड उत्पादन या विषयी शेतीशाळा होती. प्रकल्प संचालक (आत्मा, बीड) डी.जी. मुळे व तालुका कृषी अधिकारी एस.डी. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदरील शेतीशाळांमध्ये आजच्या वर्गात पीकपाणी व्यवस्थापनाविषयी माहिती देण्यात आली. तसेच बुरशीनाशकाचा योग्य उपयोग योग्यवेळी करावा याविषयी माहिती देण्यात आली. या शेती शाळेत भाजीपाला उत्पादक आणि नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. या शेतकऱ्यांच्या शेतीशाळेत महागडे रासायनिक कीटकनाशके न वापरताही सेंद्रिय पद्धतीने अल्पखर्चात ही कशा प्रकारे शेती करता येते, या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी आत्मा विभागाचे बिपीन दरफे, ज्ञानेश्वर धस, संतोष देशमुख तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. संपर्क शेतकरी चंद्रसेन तोंडे तसेच ज्ञानदेव तोंडे यांनी शेतीशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत सोनीमोहा येथे शेती शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:03 AM