शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

Agriculture News: गोगलगायीनंतर यलो मोझॅकने वाढविली चिंता, सोयाबीनवर खोडमाशी, चक्री भुंग्याचाही प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 6:30 PM

Agriculture News: आधी शंखी गोगलगायीने त्रस्त केल्यानंतर आता ‘यलो मोझॅक’ नामक व्हायरस तसेच खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकामध्ये पसरू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे.

बीड : आधी शंखी गोगलगायीने त्रस्त केल्यानंतर आता ‘यलो मोझॅक’ नामक व्हायरस तसेच खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकामध्ये पसरू लागल्याने शेतकरी चिंतेत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव, वरपगाव, श्रीपतरायवाडी तसेच अन्य परिसरात हा प्रादुर्भाव दिसून आला असून मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान विभागाच्या सूचनेनुसार कृषी अधिकारी शेतात पाहणी करून मार्गदर्शन करणार आहेत. ‘यलो मोझॅक’ मुळे सोयाबीनच्या उत्पादनाला काही प्रमाणात फटका बसू शकतो, असे मानले जात आहे.

सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे पट्टे दिसत आहेत. तर परिपक्व झालेली पाने तांबूस दिसत आहे. काही ठिकाणी पूर्ण झाड पिवळे पडत आहे.  अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लगडतात त्यामुळे उत्पन्नात घट होऊ शकते. या प्रादुर्भावामुळे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना फवारण्यांवर खर्च करावा लागत असून चिकट सापळे लावले जात आहेत. 

हंगामाआधी लागवडअंबाजोगाई तालुक्यात आढळून आलेल्या यलो मोझॅक प्रादुर्भावग्रस्त सोयाबीनची लागवड खरीप हंगामाच्या आधी केल्याचा हा परिणाम मानला जात आहे. त्यामुळे बिगरहंगामी सोयाबीनची लागवड टाळल्यास असा धोका टाळता येऊ शकतो, असा सल्ला दिला जात आहे. नियंत्रणासाठी आवश्यक औषधी आणि कीटकनाशके कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारण्याचा सल्ला दिला जात आहे.  

का पसरतोय व्हायरस? काय आहे उपाययलो मोझॅक हा व्हायरस बियाण्यातील दोष तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य कमी झाल्याने पसरण्याचा धोका असतो.  बियाणे कच्चे असेल तर असा प्रादुर्भाव होऊ शकतो.तसे दिसताच  सूक्ष्म अन्नद्रव्याची एक फवारणी करावी फरक न पडल्यास पिवळसर झाडे उपटून फेकून देणे हाच त्यावर पर्याय असल्याचे कृषी तज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले.  तसेच खोडमाशी आणि चक्रीभुंगा आण  बुरशीवर ताबडतोब नियंत्रण करणे आवश्यक आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे कापसातही मावा, तुडतुड्यांच प्रादुर्भाव असून त्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीBeedबीड