संतोष स्वामी
दिंद्रुड : दिंद्रुड ग्रामपंचायतीला अनुसूचित जमातीसाठी सरपंचपद राखीव आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ अजय कोमटवार व त्यांचे पॅनेल बहुमताने विजयी झाल्याने सरपंचपदासाठी अजय दिलीपराव कोमटवार यांच्या नावाने शिक्कामोर्तब झाले असून औपचारिक घोषणा बाकी आहे.
दिंद्रुडला उच्च शिक्षित सरपंच मिळत आहे.
पंधरा ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणुकीत येथील माजी सरपंच दिलीप कोमटवार यांच्या नेतृत्वाखाली ११ उमेदवार तर जनसेवा ग्रामविकास आघाडीचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंचपदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गात विजयी झालेले अजय कोमटवार हेच सरपंच होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. अजय दिलीपराव कोमटवार हे ३१ वर्षीय युवा सरपंचपदी विराजमान होत आहेत. एम.सी.ए.ची पदवी प्राप्त उच्च शिक्षित तरुण नेतृत्व गावाचा चेहरामोहरा आधुनिक करण्यासाठी दिंद्रुडच्या सेवेत पुढील पाच वर्षे काम करणार आहेत.
‘मला मिळालेल्या संधीचा योग्य वापर करीतत दिंद्रुडच्या शैक्षणिक, सामाजिक, आधुनिक ग्राम म्हणून दिंद्रुडचा नावलौकिक करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दिंद्रुडचा सार्वभौम विकास करीत आदर्श ग्रामपंचायत करण्याचा माझा मानस आहे.’
- अजय दिलीपराव कोमटवार