विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील टॉपच्या चार संचामध्ये परळीच्या संच क्रमांक आठचा प्लांट लोड फैक्टरमध्ये समावेश झाल्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी येथील संच क्रमांक आठच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. परळी तालुक्यातील दाऊतपूर, दादाहारी वडगाव शिवारात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे. यामध्ये २५० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ६, ७ व ८ तीन संच असून या तीन संचाची एकूण स्थापित क्षमता ७५० मेगावॅट एवढी आहे. हे तीन ही संच सुरळीत चालू असून या संचात बुधवारी ६४८ मेगावॅट एवढी वीज उत्पादित चालू होती.
परळी येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच पूर्ण क्षमतेने चालू आहेत.
कोरानाची सर्व काळजी प्रत्येक कर्मचारी घेत आहे. कसलीही कर्मचारी कपात नाही.
- मोहन आव्हाड, मुख्य अभियंता, नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्र, परळी