शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

पगार कमी असले, तरी एसटीचे चालक, वाहक समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:37 AM

अंबेजोगाई : एसटी महामंडळातील वाहक, चालक हे प्रवाशांची काळजी घेतात. कष्ट करून घर-प्रपंच चालवितात. त्यामुळे पगार कमी असले, तरी ...

अंबेजोगाई : एसटी महामंडळातील वाहक, चालक हे प्रवाशांची काळजी घेतात. कष्ट करून घर-प्रपंच चालवितात. त्यामुळे पगार कमी असले, तरी समाधानकारक जीवन जगतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते एस.बी. सय्यद यांनी केले. अंबेजोगाई आगारातील पाच कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी आगार प्रमुख नवनाथ चौरे, सहायक वाहतूक अधीक्षक अमर राऊत, वाहतूक निरीक्षक पल्लेवड, लेखाकार ओमकार कुलकर्णी, करपे, बाळासाहेब फड, बाबुलाल शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सय्यद म्हणाले, एसटी महामंडळातील कर्मचारी सेवाभावी वृत्तीने कमी पगारावर जनतेला सेवा देत आहेत. दुसरीकडे काम कमी आणि पगार जास्त आहे, तेथे सेवाभाव नाही, परंतु एसटी महामंडळामुळे राज्यातील गरीब जनतेला कमी पैशात जास्त प्रवास ही सुविधा मिळते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. त्यांच्या पगार वाढीसाठी नेत्यांसह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी आगार प्रमुख नवनाथ चौरे, करपे यांनी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व उपायांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त वाहक राजकुमार (मुन्ना) लखेरा, चालक ज्ञानोबा पौळ, चालक हनुमंत पवार, चालक अंकुश वाकडे, सहायक दिलीप शेवाळे आदींचा सहपरिवार फेटा बांधून, तसेच शाल, श्रीफळ, ड्रेस, साडीचोळी देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी आगारातील कर्मचारी, वाहक, चालक, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय काळम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब फड यांनी मानले.

030921\052003bed_1_03092021_14.jpeg~030921\052003bed_1_03092021_14.jpeg

एस.टी . कर्मचारी सेवानिवृत्तीबद्दल सत्कार~एस.टी . कर्मचारी सेवानिवृत्तीबद्दल सत्कार