यावेळी त्यांच्याबरोबर तहसीलदार मुंडलोड, तालुका कृषी अधिकारी गांगुर्डे, कृषीसेवक तसेच अंमळनेर, पिंपळवंडीचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. अंमळनेर व पिंपळवंडी परिसरात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याने
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्यामुळे पिके उद्ध्वस्त झाली असून मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
१४ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडासह गारांच्या पावसाने धो-धो सुरुवात केली. या अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकरी जनावरे चारण्यासाठी शेतात गेली होती, त्यांना या गारपीटांचा सामना करावा लागला. जनावरे आणि शेतकरी या दोघांना पावसाने झोडपले. शेतात शेतकऱ्यांनी लागवड केलेली कांदे, वांगे, तंबाटे, मिरची, शेवगा तसेच मोठ्या प्रमाणावर आलेल्या आंब्याची फळे या गारपिटीमुळे जमिनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अगोदरच कोरोनाचा होत असलेला कहर आणि त्यात गारपीटांचा पाऊस यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत आला आहे.
आंबा या फळांचे तर खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने झोडपल्याने फळबागांचेही मोठे नुकसान होऊन या फळांची व मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. अनेक शेतकऱ्यांचा शेतात तोडण्यासाठी आलेला उभा असलेला शेवगा या गारपीटांच्या पावसाने आडवा झाला. जाधववाडीत सोमनाथ जाधव यांच्या शेतातील उभा असलेला शेवगा तोडुन बाजारात विक्रिसाठी नेण्याच्या तयारीत असतानाच लॉकडाऊन आणि या गारपीटांच्या तावडीत सापडल्याने शेवगा बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. शेवग्याच्या फळबागाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.
नफा सोडा झालेला खर्च देखील पाण्यात गेल्याने जाधववाडीच्या जाधव कुटुंबाला या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. चंद्रेवाडीत अनेक शेतकरी वांगे, कांदा, मिरची, तंबाटे अशी बाजारात विकली जाणारे भाजी पाल्यांचे उत्पादन घेतात परंतु या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे रामचंद्र कापसे यांनी सांगितले.
पिंपळवंडीचे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब पवार यांची आंब्याची बाग या पावसाने झोडपून निघाल्याने आंब्याखाली मोठ्या संख्येने कैऱ्याचा खच पडल्याचे त्यांनी सांगितले. नुकसान ग्रस्त फळांचा पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाने पंचनामे करण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत, असेही ते म्हणाले. एकंदरीत अंमळनेर परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आता गारपिटीमुळे दुसरे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ चिंताग्रस्त बनल्याचे दिसून येत आहेत.
===Photopath===
150421\img-20210415-wa0143_14.jpg~150421\img-20210414-wa0219_14.jpg
===Caption===
अंमळनेर, पिंपळवंडी परिसरात गारपीट, पावसामुळे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करताना आ. आजबे.