शहरं
Join us  
Trending Stories
1
कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार, सोयाबीन उत्पादकांनाही मदत; सरकारची घाेषणा
2
टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, कोहली-रोहितची पहिली झलक; विमानतळापासून हॉटेलपर्यंत चाहत्यांचा जल्लोष
3
झिकाचा वाढतोय धोका, राज्यात आठ रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
4
Hathras Stampede : 23 वर्षांपूर्वी भोले बाबांना झालेली अटक; मृत मुलीला जादूने जिवंत करण्याचा केला होता दावा
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ४ जुलै २०२४; आनंदवार्ता मिळणार, प्रियजनांची भेट होणार
6
शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार?; आज होणार निर्णय
7
ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे निधन; १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
‘लाडकी बहीण’ योजनेत अडवणूक कराल तर...खबरदार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
9
‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर
10
८० हजार जणांना परवानगी, सत्संगाला आले अडीच लाख लोक: आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप
11
भाजप चाणक्यांना आता काळजी विधानसभांची; कोणतेही राज्य गमावणे परवडणारे नाही
12
गिधाडांवर नजर ठेवणार ‘तिसरा डोळा’; जीपीएस टॅग लावलेली दहा गिधाडे घेणार भरारी
13
सेवा हमी कायदा अंमलबजावणीचा मुख्य सचिव घेणार महिन्याला आढावा
14
...तर शेतकऱ्यांचे पुढील हाल तरी टळतील; हवामानाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत? 
15
जगातला सर्वांत छोटा व्यावसायिक चित्रकार; लियामच्या चित्रांना जगभरात पसंती
16
विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण; सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत
17
हा आमच्या राजर्षी शाहूंचा पुतळा नव्हे; दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुतळा बदला
18
आज शॉपिंग, नंतर पैसे, क्रेडिटला चांगले दिवस; तब्बल १८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार
19
व्होट बँकेसाठी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; सरकार अन् विरोधकही करतायेत राजकारण
20
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर

अंबाजोगाईचे बसस्थानक मराठवाड्यात 'स्वच्छ सुंदर'; सलग दुसऱ्या वर्षी प्रथम, १० लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 7:57 PM

समितीकडून प्रत्येक दोन महिन्यांच्या अंतरात होते तपासणी

- समर्थ भांडबीड : राज्यातील सगळे बसस्थानक स्वच्छ व सुंदर असावेत, यासाठी राज्य शासनाकडून 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत सलग दुसऱ्यावेळी अंबाजोगाई बसस्थानक छत्रपती संभाजीनगर प्रदेशात प्रथम आले आहे. यामुळे या बसस्थानकाला १० लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानासाठी राज्य परिवहन महामंडळामध्ये मध्यवर्ती व विभागीय स्तरावर दोन समित्या स्थापन केल्या आहेत. या अभियानातून स्वच्छता आराखडा तयार केला जातो. तसेच यासाठी १०० गुणांपर्यंत मूल्यांकन करुन गुण दिले जातात. यामध्ये ७६ गुण मिळवत अंबाजोगाई बसस्थानक छत्रपती संभाजीनगर प्रदेशातून प्रथम आले आहे. प्रदेशात अ, ब, क अशाप्रकारे बक्षीसाची वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकातील बसस्थानकासाठी १० लाख, द्वितीय साठी ५ तर तृतीय स्थानी राहिलेल्या बसस्थानकासाठी २.५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते.

दरम्यान या मूल्यांकनासाठी विभागस्तरावर विभाग नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. यात विभागीय स्थापत्य अभियंता, उपयंत्र अभियंता, विभागीय कामगार अधिकारी व प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. समितीकडून प्रत्येक दोन महिन्यांच्या अंतरात मध्यवर्ती समितीने ठरवून दिलेल्या विभागाची तपासणी होते. एकूण गुणांच्या ७५ टक्के पेक्षा जास्त गुण असणाऱ्या बसस्थानकांचा विचार या पुरस्कारासाठी केला जातो.

मागीलवर्षी देखील अंबाजोगाई बसस्थानकाने प्रथम येण्याचा बहुमान नोंदवला आहे. छत्रपती संभाजीनगर प्रदेशातून दोन्ही वर्षी बीड विभागातील बसस्थानकाचा नंबर आला. सर्व चालक- वाहक, अधिकारी- कर्मचाऱ्यांचा हा सन्मान आहे. - अजयकुमार मोरे, रापम विभाग नियंत्रक, बीड

टॅग्स :Beedबीडstate transportएसटी