- अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई (जि. बीड) : जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी, ही येथील नागरिकांची ३० वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर केवळ टोलवाटोलवीच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फिरलेल्या एका पत्रामुळे जिल्हा निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. मात्र, चौकशीअंती ही के वळ चर्चाच असल्याचे निष्पन्न झाले.दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीबाबत माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीचे पत्रक सोशल मीडियावरून फिरू लागले. यात दर्शविलेली तारीख व आतील मजकूर यामुळे जिल्हा निर्मितीचा प्रश्न ऐरणीवर आला की काय, अशी चर्चा सुरू झाली.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या संदर्भात फिरत असलेल्या त्या पत्रा संदर्भात उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे विचारणा केली असता जिल्हा निर्मितीसंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याने नागरिकांची निराशा झाली़
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची केवळ चर्चाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 4:41 AM