स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली गावात बस
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील मंगाईवाडी गावात भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनंतर मंगळवारी गावात एसटी बस पोहोचली. बसचे स्वागत करून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
मंगाईवाडी हे गाव तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. डोंगरकुशीतील असलेल्या या गावात आजपर्यंत कधीच एसटी बस पोहोचलीच नव्हती. मंगळवारी (१७ ऑगस्ट) बसच्या नियमित फेऱ्यांना सुरुवात झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले. बससेवा सुरू करण्यासाठी कै. यशवंतराव चव्हाण विश्वस्त मंडळ, बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजपालजी लोमटे, दिलीप लव्हारे, आगारप्रमुख नवनाथ चौरे, नियंत्रक सहायक राऊत, भागवत मोरे, पंचायत समिती सदस्य व्यंकटेश चामनर, सुभाष गडदे, संभाजी शिंदे यांनी प्रयत्न केले.
बसच्या स्वागतावेळी मुख्याध्यापक आर.बी. पठाण, नामदेव मोरे, नानासाहेब वाघ, प्रशांत देशपांडे, अनंत जोशी, प्रकाश सूर्यवंशी, अरुण जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश मेढे यांनी केले, एस.जे. सोन्नर यांनी आभार मानले.
180821\img-20210818-wa0038.jpg
बससेवा सुरू झाली