अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी मे महिन्यापासूनच चांगला पाऊस पडू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील राडी सर्कलमध्ये वादळी पाऊस झाला. या पावसाने शेतातील उसाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस मोठ्या प्रमाणात आडवा पडून मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच रानडुकरांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उसाचे नुकसान सुरूच होते. पुन्हा ऊस आडवा पडल्याने शेतकऱ्यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे.
माझ्या शेतातील दोन एक्कर ऊस आडवा पडल्याने माझे मोठे नुकसान झाले आहे. मी अगोदरच अल्पभूधारक शेतकरी असल्याने या पिकाशिवाय दुसरे कोणतेही पीक माझ्या शेतात नाही. उसाचे मोठे नुकसान झाल्याने माझा उदरनिर्वाह कसा चालणार?
शेख पाशा, शेतकरी दैठणा (राडी)
वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने या नुकसानीची त्वरित पाहणी करावी व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
- अच्युत गंगणे, तालुका अध्यक्ष, भाजप, अंबाजोगाई.
090721\1746-img-20210708-wa0131.jpg
वादळी पावसाने ऊसाचे झालेले नुकसान