अंबाजोगाई (बीड ) : ईव्हीएम मशीन द्वारे मतदान घेतल्याने लोकशाहीला धोक्यात येत आहे, त्या बंद करून मतपत्रिकेद्वारे निवडणूका घेण्यात याव्यात या मागणीसाठी मंगळवारी (दि.२५) दुपारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते बन्सीधर जोगदंड यांनी केले.
आक्रोश मोर्चा सावरकर चौक, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या दरम्यान आंदोलकांनी ई.व्ही. एम. विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे या मागणीचे निवेदन आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना दिले. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते बन्सीधर जोगदंड, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.विष्णु जाधव, संतराम पारवे, शेकापचे हनुमंत गायकवाड, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वाजेद खतीब,अॅड. सुभाष जाधव,रामभाऊ सावंत,महादेव वाव्हळे, समाधान काळुंके, विलास सरवदे,कल्याण उदार,रतन शिंगाडे, के.टी.जाधव,ज्ञानेश्वर कवठेकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.