शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

कंबोज, सोमय्या सारखी अमराठी नावे भाग्यविधाते होऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी शिवसेना खंबीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 5:33 PM

पातळी सोडून बोलणाऱ्या लोकांना गृहमंत्री अमित शहा आवर घालतील असे वाटले होते. पण शहा यांचा संपूर्ण दौरा आणि भाषण हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर होते.

केज (बीड): शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसासाठी व महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी झाली. परंतु, आज महाराष्ट्राचे राजकारण अमराठी लोक चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोहित कंबोज, नवनीत राणा, किरीट सोमैय्या ही अमराठी नावे आता महाराष्ट्राचे भाग्यविधाते होऊ पाहत आहेत, अशांसाठी शिवसेना खंबीर आहे असा इशारा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या केज येथे पक्षाच्या आढावा बैठकीसाठी मंगळवारी आल्या होत्या. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख धिंडू पाटील, जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्या तथाकथित शक्तीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्या तथाकथित शक्तीचे देशाचे गृहमंत्री अमित शहा काल महाराष्ट्राचा दौरा करून गेले. शहा हे राज्यातील पीक परिस्थितीवर बोलतील. असे वाटले होते. मात्र हेक्टर आणि एकर या मधला फरक न कळणाऱ्या कृषिमंत्र्यांकडून अहवाल काय मिळाला असणार ? असा टोला त्यांनी लगावला. 

भाजपसमोर शिवसेनेचे आव्हानखासदार नवनीत राणा या सांप्रदायिक दंगली का उसळतात ? मेळघाटातील कुपोषण, अमरावतीचे आणि मतदार संघातील प्रश्न यावर कधी बोलणार, अशा चव सोडून बोलणाऱ्या लोकांना गृहमंत्री अमित शहा आवर घालतील असे वाटले होते. पण शहा यांचा संपूर्ण दौरा आणि भाषण हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यावर होते. त्याचा आम्हाला अभिमान आहे. यातच शिवसेनेची ताकद आहे. यावरून येणाऱ्या निवडणुकात भाजपासमोर शिवसेनेचेच मोठे आव्हान उभे आहे हे स्पष्ट होते, असेही अंधारे म्हणाल्या.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBeedबीडBJPभाजपा