शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

अधुरी एक कहाणी; तांड्यावरचा जवान मेहनतीने सैन्यात गेला, मात्र कॅन्सरमुळे झाला अकाली मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 6:27 PM

चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्कराेगाचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत होते.

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : देशसेवेने झपाटलेला तांड्यावरचा तरुण मेहनत व जिद्दीने सैन्य दलात भरती झाला. शेतकरी कुटुंबाचे नशीब पालटले. मात्र, कर्करोगासारख्या घातक आजाराने जवानाला गाठले अन् काही दिवसांतच होत्याचे नव्हते झाले. सुखी संसाराची कहाणी अधुरीच राहिली अन् देशसेवेचे स्वप्नही अपूर्णच राहिले.

तालुक्यातील राजेगाव येथील बाराभाई तांड्यावरील भारत रामराव राठोड (२९) या जवानाचा कर्करोगाने ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. ४ रोजी त्यांचे पार्थिव पुण्याहून बीडला आणले. बाराभाई तांडा येेथे त्यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला. १९९३ मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भारत राठोड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजेगाव येथे झाले. लहानपणापासूनच भारत यांना देशसेवेचे आकर्षण होते. काटक व पिळदार शरीरयष्टी व जिद्दीच्या जोरावर त्यांची २०१२ साली सैन्य दलात निवड झाली. नागपूर येथे काही दिवस प्रशिक्षण घेतल्यानंतर जम्मू येथे त्यांना नियुक्ती मिळाली. सध्या ते तेथेच कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्कराेगाचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत होते. मात्र, प्रकृती खालावत गेली, त्यानंतर ३ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

कुटुंबीय शोकमग्नभारतचे आई-वडील हे शेतीबरोबरच मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात. त्यांच्यामागे एक लहान बहीण, भाऊ अशी दोन भावंडे, पत्नी व ५ व ३ वर्षांच्या दोन मुली असा परिवार आहे. भारत हे कुटुंबाचा आधार होते. मात्र, नियतीने त्यांना हिरावून नेल्याने कुटुंब शोकमग्न झाले.

दोन महिन्यांपूर्वीची भेट अखेरचीभारत राठोड हे दोन महिन्यांपूर्वी बाराभाई तांडा येथे आले होते. काही दिवस राहून ते कर्तव्यावर परतले होते. दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांशी झालेली भेट अखेरची ठरली. त्यांच्या आठवणी जागवत कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत.

बरा होऊन येईन....दरम्यान, कर्करोगाचे निदान झाल्यावर भारत राठोड यांनी उपचार सुरू केले होते. कुटुंबीय काळजीत होते. तेव्हा त्यांनी धीर दिला होता. मी बरा होऊन लवकरच घरी येईन, असे ते म्हटले होते. मात्र, ते ते परतलेच नाहीत. त्यांच्या निधनाची वार्ता आल्यावर कुटुंबीयाला धक्का बसला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBeedबीडDeathमृत्यू