अंगणवाडीतील नोंदी व कामकाज ऑनलाइन करण्यासाठी अंगणवाडीताईंना स्वतंत्र ॲपसह मोबाइल देण्यात आले आहे. मात्र हा मोबाइल व ॲप व्यवस्थित चालत नसल्याने चुकीच्या नोंदी होत आहेत. त्यामुळे अंगणवाडीताई बेजार झाल्या होत्या. पूर्वीप्रमाणे लेखी नोंदी घेण्याचा इशारा देत मोबाइल शासनाला परत करण्याचे आंदोलन सर्वच अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने धारूर तालुक्यातील अंगणवाडीताईंचे मोबाइल बालविकास प्रकल्प अधिकारी लक्ष्मण कदम यांच्याकडे देण्यात आले. या पुढे लेखी स्वरूपात सर्व नोंदी रजिस्टरमध्ये ठेवल्या जातील, असे शासनाला कळविण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संध्या मिश्रा, जिल्हा उपाध्यक्ष अनुसया वायबसे, सचिव सिंधूताई घोळवे, केज तालुकाध्यक्ष शेख इरफान धारूर तालुकाध्यक्ष पुष्पा आलाट, महानंदा काकडे, मंगल घोळवे, अलका लगड, मीना राऊत, मीनाक्षी कांदे, शारदा पांचाळसह अंगणवाडीताई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
230821\img-20210823-wa0085.jpg~230821\img-20210823-wa0088.jpg
मोबाईल वापसि अंदोलन~सोमवारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे मोबाईल वापस अंदोलन यशस्वी