माजलगाव : माजलगावातील राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी सकाळी आंदोलकांनी आ.सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. नंतर घराजवळील त्यांच्या गाडीसह इतर वाहने पेटविले. याच ठिकाणी काही आंदोलकांनी घरातील साहित्यालाही आग लावली. हा तणाव कसा तरी शांत करून पोलिसांनी तेथून काढून दिला. परंतू आंदोलकांनी पुन्हा शहरातील मुख्य मार्गावर येत दगडफेक केली. यावेळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व पोलिसांचा फौजफाटा शहरात पोहचला.
Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या
दरम्यान, याच आंदोलकांनी आ.सोळंके यांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक संस्था, सहकारी संस्थांच्या इमारतीवरही दगडफेक केली. तसेच संस्थासंमाेर टायर जाळण्यात आले. तेथून हे आंदोलक नगर पालिकेत गेले. तेथेही जाळपोळ करून दगडफेक केली. सध्या तरी शहरात तणावाचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले. आंदोलकांकडून आ.सोळंके यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.
आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्याकाही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर माजलगावचे राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने सोमवारी सकाळी मराठा समाजबांधव आक्रमक झाले. आ.सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक करण्यात आली.तसेच घरातील कार्यालय, गाड्या देखील आंदोलकांनी पेटवून दिल्या.