बीड : महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या ग्रंथांना महाराष्ट्रात, देशात व परदेशात मोठी मागणी असल्याने या महापुरूषाशी संबंधित सर्व अप्रकाशित साहित्य, लेखन, संशोधनाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुढील तीन वर्षांसाठी पुनर्गठन केले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत. तर सचिन साठे हे येथील बलभीम महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. वसंत सानप, उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते, प्रा. सुधाकर ढवळे, पर्यवेक्षक प्रा. विजय गुंड, प्रा. राम जाधव, प्रबंधक भास्कर सुरवसे, कार्यालय अधीक्षक पी. पी. डावकर, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.