लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरात आणखी एका कुंटणखान्यावर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. धानोरा रोडवरील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून एका महिलेची सुटका करीत आंटीसह चार ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी रात्री ११ वाजता केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.बीड, अंबाजोगाई, माजलगामधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केल्यानंतर पुन्हा एकदा बीडमधील एका कुंटणखान्यावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. ज्योती नारायण दहे ही आंटी मुंबई, ठाण्याच्या महिला व मुलींना बीडमध्ये आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. ही माहिती पोलिसांना समजली. त्यांनी खात्री केली. त्यानंतर मंगळवारी रात्री सापळा लावला. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली. तर चार ग्राहकांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, अमावाप्र. कक्षाच्या फौजदार दीपाली गित्ते, भारत माने, एस.एस.भारती, आप्पासाहेब सानप, शेख शमीम पाशा, एस.सी.उगले, एन.आर.खटाणे, एम.जी.घोडके, एस.एम.चौरे यांनी केली.दरम्यान, ज्योती दहे या आंटीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये आणखी एका कुंटणखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:49 AM
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरात आणखी एका कुंटणखान्यावर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. धानोरा रोडवरील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून एका महिलेची सुटका करीत आंटीसह चार ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी रात्री ११ वाजता केली. या घटनेने सर्वत्र खळबळ ...
ठळक मुद्देमुंबईच्या महिलेची सुटका आंटीसह चार ग्राहक ताब्यात