तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक स्व:त हून कोविड सेंटर व शासकीय रुग्णालयात जाऊन अँटिजेन व आर.टी.पी.सी.आर.ची तपासणी करून घेत आहेत.
अँटिजेन तपासणी केली ती निगेटिव्ह येऊन ही रुग्णांना त्रास असेल तर आर.टी.पी.सी.आर.ची तपासणी करणे गरजेचे आसते. पण काही वेळेस आर.टी.पी.सी.आर.चा जो अर्ज ऑनलाईन करावा लागतो. त्या वेळेस साईड हँग झाल्याने रुग्णांना २-२ तास ताटकळत बसण्याची वेळ येत आहे.
माजलगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिक स्व:तहून केसापुरी येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात जाऊन अँटीजेन व आर.टी.पी.सी.आर.तपासणी करत आहेत. या ठिकाणी अँटिजेन करणाऱ्यांची संख्या दीडशे ते दोनशेच्या आसपास आहे. अँटिजेन करूनही काही रुग्णांना त्रास होत असेल तर आर.टी.पी.सी.आर.ची तपासणी करून घेतली जात आहे. आर.टी.पी.सी.आर.ची दररोज ५० ते ७० नागरिक तपासणी करून घेत आहेत, त्याचा अर्ज भरून तो साईटवर ऑनलाईन करावा लागतो. ती साईट २-२ तास हँग होत आहे. त्यामुळे तपासणी करण्यासाठी नागरिकांना ताटकळत बसावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिक तपासणीसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो. अनेक वेळा वेबसाईट काहीकाळासाठी हँग होतात व परत चालूही होतात.
डॉ. गजानन रुद्रवार, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय
===Photopath===
280421\purusttam karva_img-20210428-wa0021_14.jpg