बीड : जिल्हा रुग्णालयात येऊन गोंधळ घालणाऱ्या विरोधात प्रशासन काहीच कारवाई करीत नाही, असा समज झाला आहे. गुरुवारी रात्री प्रसूती विभागात येऊन गोंधळ घालणा-या शिवसेना कार्यकर्त्याविरोधात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कसलीच कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे आता कोणीही यावे अन् गोंधळ घालून जावे, अशी काहीशी परिस्थिती या घटनेवरुन दिसून येत आहे.जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात गुरुवारी रात्री जवळपास १ तास शिवसेनेच्या कार्यकर्त्याने गोंधळ घातला होता. वास्तविक पाहता आचारसंहिता चालू असताना आणि पूर्व परवानगी न घेताच ठिय्या मांडून प्रशासनाला वेठीस धरणे चूक आहे. प्रसूती विभागात चित्रीकरण करणेही चूक आहे. येथील समस्यांसंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक अथवा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करणे अपेक्षित होते, मात्र असा कुठलाही प्रकार न करता गोंधळ घातला गेल्याचे सांगण्यात आले होते. याप्रकारामुळे या विभागातील परिचारिका, महिला रुग्णांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार समजल्यानंतर डॉ. हुबेकर व डॉ.आय.व्ही. शिंदे हे वरिष्ठ अधिकारीही रुग्णालयात आले होते.दरम्यान, शुक्रवारी या शिवसेना कार्यकर्त्याविरोधात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तक्रार देणे अपेक्षित होते, मात्र प्रशासनाने आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.
कोणीही या अन् गोंधळ घाला; प्रशासनाला गांभीर्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:58 PM
जिल्हा रुग्णालयात येऊन गोंधळ घालणाऱ्या विरोधात प्रशासन काहीच कारवाई करीत नाही, असा समज झाला आहे.
ठळक मुद्दे‘त्या’ शिवसेना कार्यकर्त्याविरोधात तक्रार देण्यास आखडता हात