सतराव्या शतकामध्ये सेवालाल महाराज यांनी गोरगरीब जनतेला अंधश्रध्देतून बाहेर काढण्याचे काम केले. ‘जाणजो छाणजो, पचज माणजो’ या वाक्यातून त्याची चिकित्सक वृत्ती दिसून येते. इंग्रजांविरुध्द उठाव, अन्याय अत्याचार विरुध्द लढा, ‘कोयी केती नानो मोठो छेई’ या वाक्यातून सामाजिक एकोपा आपल्याला पहायाला मिळतो. ‘अनुभवेती सीक जको खरो’ माणूस अनुभवातूनच घडत असतो. सर्व समाज घटकाना एकत्र आणण्याचे काम सद्गुरु सेवालाल महाराज यांनी केले.
सेवालाल महाराजांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली व सर्व शासकीय कार्यालयात व सर्वत्र सेवालाल महाराज यांची १५ फेब्रुवारीला जयंती केली जाते. त्यांच्या कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेला जयंतीच्या निमित्ताने करावी, असे आवाहन गोरसेना संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब राठोड यांनी केले आहे.