बीड : शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक नगर रोडवर अनेक शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय तसेच मंगल कार्यालय आहेत. येथे नेहमी वर्दळ असून, अपघातांची संख्या देखील वाढू लागली आहे. येथे असलेल्या गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे नसून सूचना फलक देखील लावलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीकडे लक्ष देऊन गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत आणि सूचना फलक लावावेत, अशी मागणी समाजसेवक शेख मोहसीन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
कांतराव कलाणे यांना पीएच. डी. पदवी
बीड : तालुक्यातील नेकनूर येथील प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. कांतराव कलाणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने संशोधनातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे. ‘मराठ्यांच्या इतिहास लेखनातील जयसिंगराव पवार यांचे योगदान’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
ढेकणमोहा येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम
ढेकणमोहा : बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपाइंचे सुभाष तांगडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी माजी सरपंच नागेश शिंदे, नारायण देवकते, रामा भोगे, दयाराम पवार, अशोक थापडे, नितीन शिंदे, विनाेद शिंदे, मानसिंह ठाकूर उपस्थित होते.
गुन्हा नोंद करण्याची पत्रकाद्वारे मागणी
बीड : बीड येथील न्यायालयाने जामीन दिलेला नसताना बोगस जामीन पत्राद्वारे हर्सूल जेलमधून आरोपींना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे उपाध्यक्ष सय्यद जावेद अली अन्सार अली यांनी केली.
शहीद जवानांना नेकनूर येथे श्रध्दांजली
बीड : तालुक्यातील नेकनूर येथील हेल्प फाउंडेशनतर्फे पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हामेद सलीम, सतीश मुळे, सय्यद जाहेद, अमीर मदनी, सलमान नदाफ , सय्यद वाजेद आदी उपस्थित होेते.