दिंद्रूड : धारुर तालुक्यातील चाटगांव येथील संविधान दीपक गडसिंग या नऊ वर्षीय विद्यार्थ्याने पाण्याच्या खोल डोहातून पाच वर्षीय मुलीला बाहेर काढत प्राण वाचवले होते. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर बुधवारी येथील इन्स्पायर्ड मॉर्निंग समितीच्या वतीने संविधानच्या शौर्याची दखल घेत कौतुक केले. या कार्यक्रमात आ. प्रकाश सोळंके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.बुधवारी डॉ. दत्ता भुजबळ,डॉ. सतीश जाधव, चंद्रकांत गायकवाड, संतोष स्वामी, प्रमोद देशमाने, ओंकार काटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून संविधानसाठी कपडे, शाळेचे दप्तर, शालेय साहित्य आणून ते आ. प्रकाश सोळंके यांच्या हस्ते सुपुर्द करत गौरव केला. माजलगाव तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, जि. प. बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, समाजकल्याण सभापती कल्याण आबूज, माजलगाव पं. स. सभापती जयदत्त नरवडे यांची उपस्थिती होती.
दिंद्रूडमध्ये संविधानच्या धाडसाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:50 PM
धारुर तालुक्यातील चाटगांव येथील संविधान दीपक गडसिंग या नऊ वर्षीय विद्यार्थ्याने पाण्याच्या खोल डोहातून पाच वर्षीय मुलीला बाहेर काढत प्राण वाचवले होते. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर बुधवारी येथील इन्स्पायर्ड मॉर्निंग समितीच्या वतीने संविधानच्या शौर्याची दखल घेत कौतुक केले.
ठळक मुद्देइन्स्पायर्ड मॉर्निंग समितीच्या कार्यक्रमात प्रकाश सोळंकेंच्या हस्ते गौरव