रेहान लियाकत खान (२७, रा. धांडेगल्ली, तेरवी लाईन, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयातील लेबर वॉर्डात ९ रोजी मध्यरात्री परिचारिका अश्विनी गवते या कर्तव्यावर होत्या. ड्युटी सुरु होताना त्यांनी आधीच्या परिचारिकांकडून १६ रेमडेसिविर इंजेक्शन घेतले होते. ते त्यांनी मेडिसीन ट्रॉलीत ठेवले होते. पहाटे तीन वाजता एका रुग्णाने आवाज दिल्याने सुई बदलण्यासाठी अश्विनी गवते गेल्या होत्या. ही संधी साधत मेडिसीन ट्रॉलीतून एक रेमडेसिविर इंजेक्शन गायब झाले. याप्रकरणी गवते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. प्रभारी सहाय्यक निरीक्षक मुस्ताफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. महेश जोगदंड यांनी तपासचक्रे सुरु केली. या कोरोना
कक्षात पिवळ्या रंगाचा एक तरुण विनाकारण फिरत होता. त्यामुळे गवते यांना त्याच्यावर संशय होता. या संशयिताच्या वर्णनावरून पो. ना. महेश जोगदंड यांनी त्याचा छडा लावला. धांडे गल्लीतून रविवारी रात्री साडेअकरा वाजता त्यास ताब्यात घेतले. चोरलेले रेमडेसिविर इंजेक्शन सोमवारी त्याच्या घरातून हस्तगत करण्यात आले.