नितीन कांबळे, कडा -आष्टीचे तहसीलदार यांच्या गाडीला सोमवारी पहाटे अडीच,तीन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. आगीत शासकीय वाहन पुर्णपणे जळाले आहे. हि आग अचानक लागली की,कोणी लावली याचा तपास लावण्याचे आव्हान आष्टी पोलिसांसमोर आहे. तहसीलदार याची गाडी अचानक जळाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आष्टी येथील तहसीलदार प्रमोद गायकवाड हे रविवारी राञी नेहमी प्रमाणे जुन्या तहसिलदार निवास समोर शासकीय वाहन क्रमांक एम.एच २३,एफ.१००३ लावले होते.पहाटे अडीच,तीनच्या दरम्यान अचानक या गाडीने पेट घेतला.घटनेची माहिती होताच तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली.याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायतच्या अग्नीशामक गाडीला बोलवत आग विजविण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली माञ तहसिलदार यांची गाडी पूर्ण भस्मसात झाली आहे.
आष्टी येथील तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला आग लावली की,आग लागली याचा तपास आष्टी पोलिस करीत आहेत.घटनेची माहिती कळताच घटनास्थळी तहसीलदार गायकवाड पोलीस निरीक्षक खेतमाळस,नगराध्यक्ष जिया बेग यांची तातडीने धाव,अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली नगराध्यक्ष जिया बेग यांनी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.